Kulang Fort ( कुलंग किल्ला )
Fort height: 4825
Type of fort: Giridurg
Mountain range: Kalsubai
District: Nashik
Category: Difficult
Alang, Madan and Kulanggad in Sahyadri are the most difficult to climb. Of these, one can only walk to Kulanggad, but to reach Alang, Madan fort, one must be aware of the technique of rock climbing and have the materials. In the range of Kalsubai, along with Kulang fort, there are many forts like Alang, Madan, Parbagad, Ratangad Kalsubai.
Places to see:
Kulang's second door is still intact. Its ramparts are still in good condition. Upon reaching the fort through the gate, a path turns to the right. A little further along this path, there are two to three caves in the rocky outcrop. The innermost cavity is large and has two branches inside. These caves are perfect for a stay.
A little further along the footpath near the cave, 2-3 tanks of water are required. The water in the first tank is suitable for drinking. This tank is the largest of the barrows and is completely carved into the rock. On the upper side of these tanks you can see the remains of 2 ruined castles. Due to the size of the castle, it seems to have a large population. Wade used to go to the western end of Kulang. There is a big tower here. From there you can see a mountain called 'Chhotya Kulang'. In the distance in front, you can see the road coming from Ghatghar village. In the distance is the Wilson Dam Reservoir. Now, seeing the western edge of Kulang, he would come to the door and wait with his left hand. In five minutes we reach a group of ten tanks on Kulang. The water is not potable. Shivling is carved in the rock here. Within 20 minutes of seeing the tank and heading in the opposite direction, we reach a ghali on Kulang. The greatest discovery of fortifications can be seen in this time of Kulang. At this time, a dam has been built to block the water of the waterfall coming from the upper side. It is seen that many tanks have been built at the top to block the water of this dam. So that the water of the waterfall first collects in these tanks, then when the tank is full, a drain is removed from the dam to get the water out of it. This water falls down through a gorge and is thrown into the valley. The name of the architect who created this beautiful structure is unknown. This was done to meet the water shortage of the people living on the fort. Seeing this dam, one used to go to the eastern end of the fort. From here there is a beautiful view of Alang and Madan. In the distance, the peak of Kalsubai can be seen in the sky. To the west, Ratangad and the cone of Khutta can be seen.
Reach:
1) There is a village called Kalsuthe at a distance of 10 km from Ghoti. Private jeeps and autos are also available to get here. Here you have to get down and start your car. From here it takes two hours to reach a village called Kulangwadi. Although Kulangwadi village is at the foot of the fort, the main road to the fort is at a distance of two hours from Kulangwadi. Since the path is through the forest, the sun does not bother much. In the middle, you can find a path coming from Ambewadi in the forest on the bank of a stream. From here all the shares come together and go to the fort. The path is through the forest and sometimes through the open plateau. Water is available in the streams along the way till December. After about two hours of climbing, we reach a plateau. Seen above the head, the rocky hill of Kulang still stands with a stiff neck.
From here, things get trickier. These paths are the steps carved out of the rock. We reach the first gate of the fort in about two hours, with the valley of Kulang on one side and the cliff on the right, with a slight erosion in between. Reaching the first door, it feels like a little bit of life. However, to reach the last door, one still has to climb 100 steps. There is a small cave near the first door. From here there is a beautiful view of the valley between Alang, Madan and Kulang.
2) The second road to the fort passes through Ambewadi village. It takes about an hour to reach Ambewadi village via Ghoti. ST bus service is available from Ghoti to Ambewadi. To reach the fort from Ambewadi village, one has to walk for two hours and then turn left into the forest at one point. The sign to remember is that there is a big whirlwind the size of a man here. There is a waiting area coming from Kulang Wadi. If you want to know if you haven't missed it, looking up means you understand that you are standing below the edge of Madan Fort. The next wait from here is as given above.
Accommodation:
There are some caves to stay on the fort. It can accommodate 30 to 40 people.
Meals:
Meals should be arranged by yourself.
Water supply:
There are perennial water tanks on the fort.
Travel time:
1) It takes 5 hours from Kulangwadi,
2) It takes 5 hours from Ambewadi.
Notice:
1) Avoid going to Kulanggad in rainy season.
2) Alang, Madan, Kulanggad trek can be done in 2-3 days.
3) You can only walk on Kulanggad, but to reach Alang, Madan fort, you need to be aware of the technique of rock climbing and have materials.
4) Information about Alang and Madan forts is given on the site.
YouTube video link ⬇️
किल्ल्याची ऊंची : 4825
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नाशिक
श्रेणी :कठीण
सह्याद्री मधील अलंग, मदन, कुलंगगड हे दुर्गत्रिकूट चढायला सर्वात कठीण आहे. यातील कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे. कळसुबाईच्या रांगेमध्ये कुलंग गडाच्या जोडीला अलंग, मदन, पारबगड, रतनगड कळसुबाई असे अनेक किल्ले ठाण मांडुन बसलेले आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
कुलंगचा दुसर्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळ कड्यामध्येच दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत.
गुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. यातील पहिल्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. ही टाकी बर्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते. समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. आता कुलंगचा पश्चिम कडा पाहून दरवाजापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची. पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. टाकी पाहून समोरची दिशा धरायची २० मिनीटात आपण कुलंगवरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. कुलंगच्या या घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो. या बांधार्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. किल्ल्यावर रहाणार्यांच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) घोटीहून १० किमी वर कळसुथे नावाचे गाव आहे. इथेपर्यंत जाण्यासाठी खाजगी जीप, ऑटो ची सुध्दा सोय होते. इथे पाय उतार होऊन आपली पायगाडी चालू करायची. येथुन दोन तासांवर कुलंगवाडी नावाचे गाव लागते.कुलंगवाडी गाव जरी किल्ल्याच्या पायथ्याशी असले तरी किल्ल्यावर जाण्याचा मुख्य रस्ता कुलंगवाडीपासून दोन तासांच्या अंतरावर चालू होतो. वाट जंगलामधुन असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नाही. मध्येच एका ओढ्याच्या काठी जंगलामध्ये आंबेवाडी मधून येणारी वाट येऊन मिळते. येथून सर्व वाटा एकत्र होऊन किल्ल्यावर जातात. वाट मधुनच जंगलातून तर कधी उघड्या पठारावरुन जाणारी आहे. डिसेंबर पर्यंत वाटेत असणार्या ओढ्यामध्ये पाणी मिळते. साधारण दोन तासांच्या चढाईनंतर आपण एका पठारावर पोहोचतो. डोक्याच्या वर पाहिल्यावर कुलंगचा खडा पहाड अजुनही ताठ मानेने उभा असतो.
येथुन चालू होते ती खरी कातळ चढाई. ही वाट म्हणजे कातळामधुन कोरलेल्या पायर्याच आहेत. एका बाजूला कुलंगची दरी आणि उजव्या बाजूस कातळ, मध्येच थोडासा मातीचा घसारा अशा तर्हेने साधारण दोन तासाने आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो. पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्यावर थोडा जीवात जीव आल्या सारखा वाटतो. तरी शेवटच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजुन १०० पायर्या चढून जाव्या लागतात. पहिल्या दरवाज्यापाशी छोटीशी गुहा आहे. इथुन अलंग, मदन आणि कुलंग मधील दरीचे सुंदर दर्शन होते.
२) किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आंबेवाडी गावातून जाते. घोटी मार्गे आंबेवाडी गाव गाठण्यास सुमारे एक तास लागतो. घोटीवरुन आंबेवाडीसाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे. आंबेवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आधी दोन तासांची रपेट करावी लागते आणि मग वाट मध्येच एके ठिकाणी डावीकडे जंगलामध्ये वळते. लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे इथे एका माणसाच्या आकाराचे मोठे वारुळ आहे. तिथेच कुलंग वाडी वरुन येणारी वाट येऊन मिळते. वाट चुकलो नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर वर पहायचे म्हणजे आपण मदन किल्ल्याच्या नेढ्याच्या बरोबर खाली उभे असल्याचे समजते. इथून पुढची वाट वर दिल्याप्रमाणे आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्यासाठी काही गुहा आहेत. त्यामध्ये ३० ते ४० जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची बारमाही टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) कुलंगवाडीतून ५ तास लागतात,
२) आंबेवाडीतून ५ तास लागतात.
सूचना :
१) कुलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.
२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.
३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.
४) अलंग, मदन गडांची माहिती साईटवर दिलेली आहे.
Comments
Post a Comment