Hadsar Fort (हडसर किल्ला)


Fort height: 3200
Type of fort: Giridurg
District: Pune
Mountain Range: Naneghat
Category: Medium

Sahyadri is a mine of forts, Junnar taluka in Pune district is surrounded by forts.  Hudsar is a beautiful fort in the area.  Starting from Naneghata, you can take a six day trek to Jeevdhan, Chavand, Shivneri, Lenyadri, Hudsar and Harishchandragad.

History:
Another name of Hudsar fort is Parvatgad.  The fort was built during the Satavahana period, during which a large number of people lived on the fort.  The fort was built on the outskirts of the town to protect Naneghat.  Historical documents state that Hudsar fort was included in the treaty made by Shahaji Raja with the Mughals in 1637.  After this, around 1818, the British conquered Junnar and the surrounding forts.  The fort of Hudsar was blown up by the British.

 Places to see:
The entrance to Hudsar fort is a beautiful example of architecture.  The entrance to the Bogdevja entrance is a unique feature of the fort, with its doorways, pipe-carved steps and a gomukh structure.  When you come up through the main gate of the fort, there are two parts.  One of these paths leads to the front hill, while the other path leads to the other entrance on the left.  When you come up through the second door, there is a water tank in front of you.  The water in it is drinkable.  Here is a hill in front.  Walking in the direction of this hill, turn left and you will see three spacious rooms carved in the last rock near the ridge.  Ganesha images are engraved on his forehead.  These warehouses are unsuitable for living.  Going to the right from here, there is a big lake and a temple of Lord Mahadev.  There is a big nandi in front of the temple and there are six corners in the assembly hall of the temple.  In one of the corners there is an idol of Ganesha, an eagle and in one there is an idol of Hanuman.  There is a strong tower in front of the temple.  There is a lake in front of the temple.  During the rainy season, the lake stores a lot of water.

In the middle of the pond is a pond-like stone carved structure.  As you descend to the right of the bastion wall, you will see a dilapidated tank.  A little further on, there is a large cave dug in the rock.  But this cave is the gateway of the guards.  From the hill in front of the temple, the area of ​​Manikdoh reservoir looks very beautiful.  Also Chavand, Naneghat, Shivneri, Bhairavgad, Jeevdhan can be seen.  Return from here to the entrance and take the return route.

 Reach:
There are two ways to reach this fort.  One of these paths is towards the royal gate and the other path is built by the villagers by carving steps in stone for the convenience of the trio.  To reach the fort by any route, one has to reach Hudsar.
 From Junnar, one can reach Hudsar in half an hour by taking a bus from Nimgiri, Rajur or Kevada.  Walk a little further up the plateau on the left.  After walking through the fields on the plateau, you can see the gorge between the two mountains and the ramparts between them at a distance of 15 minutes.  After walking in front of the gorge, we reach the bastion in half an hour.  From here we reach the gate of the fort by easy climbing.  Along the way, two water tanks are found across the hill.  The second way is to walk straight ahead without turning towards this gorge and turn to the left side of the hill to reach the back side of the hill.  From here, after climbing one hundred to one hundred and fifty steps, we reach the main gate of the gorge.  It is very easy to wait for the palace.  From here it takes one hour to reach the fort.

 Accommodation:
The temple of Lord Mahadev at Hudsar can accommodate 4 to 5 people.  However, it is inconvenient to stay in the temple as water accumulates in the rainy season.

 Meals:
Since there is no dining facility at the fort, you should do it yourself.

 Water supply:
There is a perennial drinking water tank in front of the fort.

 Travel time:
It takes 1 hour to reach the fort from Hudsar village.

YouTube video link ⬇️

किल्ल्याची ऊंची :  3200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
डोंगररांग: नाणेघाट
श्रेणी : मध्यम

सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.

इतिहास :
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.

पहाण्याची ठिकाणे :
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्‍या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते, तर दुसरी वाट डावीकडे असणार्‍या दुसर्‍या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसर्‍या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कड्यालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेश प्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव आणि महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. 

तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेकर्‍यांची देवडी आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. तसेच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे. 
पोहोचण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकर्‍यांनी त्र्‍यांच्या सोयीसाठी दगडात पायर्‍या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. 
जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते.. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्‍या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणार्‍या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायर्‍या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.

राहाण्याची सोय :
हडसर वरील महादेवाच्या मंदिरात ४ ते ५ जणांना राहता येते. मात्र पावसाळ्यात मंदिरात पाणी साठत असल्याने राहण्याची गैरसोय होते.

जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.

पाण्याची सोय :
किल्ल्यावर प्रवेशद्वारातून वरती आल्यावर समोरच बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :
हडसर गावातून गडावर जाण्यास १ तास लागतो.

Comments

Popular posts from this blog

Kulang Fort ( कुलंग किल्ला )

Madan Fort ( मदन किल्ला )